विषय _नको हा दुरावा*

**काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित शुक्रवारचा प्रेम काव्य लेखन उपक्रम*

*विषय _नको हा दुरावा*

आज गो बारस
 प्रीत मोहरली
गाय वासराची 
जोडी बहरली.. १

नाते प्रेमाचेच
रेशमी धाग्याला
सदा  बांधलेले
मग का अबोला.. २

सख्या बोल ना रे
नको हा दुरावा
निराश मनाला
हातच फिरावा.. ३

गंधाळले भाव
मनी फुले प्रीत
सांज बहरली
गाते प्रेम गीत.. ४

किती तुला सांगू
भावा अंतरीचे
सदा शल्य असे
तुझ्या विरहाचे.. ५

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता