विषय* गुलाब, अष्टाक्षरी

अर्लियन के ए अध्यात्म पुणे आयोजित 

*उपक्रम* 112(15.10.2025)

*विषय*    गुलाब, अष्टाक्षरी

राजा फुलांचा गुलाब
   सदा काट्यात फुलतो
आली कितीही संकटे
   प्रेमासाठी तो झुलतो.१

प्रेम प्रतीक गुलाब
    प्रिय व्यक्तीलाच देतो
समर्पित भक्तीने तो
       सदा हर्ष घेतो देतो. २

पद काटेरी मुगुट
    सांगे गुलाब प्रजाला
 हवा विवेक राजाला
    कृती ती सांगे जनाला. ३

शोभे  राजाच गुलाब
ऊन पाऊस काट्यात
     फुले सदा आनंदाने
स्थान प्रत्येकी मनात. ४

शिकवण निसर्गाची
     दुःखा सुखात  बेधुंद 
 समभाव  दरवळे
        परिमळु पुष्पगंध. ५

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता