विषय _अंहकार!*अभंग

मंगळवारचा विशेष सामाजिक काव्य लेखन उपक्रम* 
*विषय _अंहकार!*
अभंग
मना हवी शांतीl अहंकार मारू
   हर्षोल्हास भरूl  चला सारे ll १

प्रतिष्ठा मिळता lअंगी गर्व चढेll
तुका देई धडेl जगण्याचेll २

अभंगाची वाणीlगाऊ मोदगाणीll
रंक राजा जनी l सारखेची ll ३

अहंकार सोडाl दानधर्म कराll
पुण्यकर्म जराl ज्ञाना म्हणेll ४

नातीगोती नकाl विसरून जाऊll
काळजी ती घेऊl प्रत्येकाचीll ५

अहंकारी कंस l गर्वाने रावणll
झाले हो दहनl  इतिहासी ll ६

मना मम् ध्यासl माऊलीची भेटll
व्हावी वाटे थेट lपांडुरंगा ll ७

सोडा अहंकार lरामकृष्ण आले ll 
  जगातून गेलेl का तो गर्व ll ८

सुरेखा विनवेl नको अहंकार ll
विनयाचा सार l सदा राहो ll ९

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!