विषय :- गरज कामवालीची*नाव- बिन पगारी फुल अधिकारी
*काव्यबहर साहित्य मंच, भंडारा.*
*दिनांक :- १२.०८.२०२५ (मंगळवार)*
*उपक्रम क्रमांक :- ९८५ (सामाजिक काव्य)*
*विषय :- गरज कामवालीची*
नाव- बिन पगारी फुल अधिकारी
भासे गरज कामवालीची
जेव्हा गृहलक्ष्मी नसे घरी
तेव्हा महती कळे आईची
तिच सदा राबे घरी दारी.. १
महागाई तोंड देण्या तीच
काम करते सदा बाहेर
घरीदारी,नोकरी करते
मदतीचा करावा आहेर.. २
करे तारेवर कसरत
सदा तिची होते धावपळ
अति ताण पडता आजारी
होई घरात सारा गोंधळ.. ३
बाई महत्त्व ते ओळखून
सदा करावी तिची कदर
तिला रागावून न बोलता
प्रेम भरे करावा आदर..४
आला गेला पै पाहुणा पाही
मुले नोकरी घर सांभाळून
आरोग्याची ही काळजी घेई
स्वतः जगणं दे गुंडाळून.. ५
प्रत्येकाच्या घरातली आई
घरी सर्वांसाठी झिजणारी
सदा स्वतः शिळपाक खाई
मुलाबाळा ताज घालणारी.. ६
आई असते बिन पगारी
फुल अधिकारी कामवाली
सर्वांसाठी सदा राबणारी
अशी प्रत्येकाची घरवाली.. ७
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे