विषय-- मनाचे तारुण्य शीर्षक--सकारात्मकता

अर्लियन के ए पुणे 
प्रतिष्ठान आयोजित 
उपक्रम क्रमांक 109 
दि.11/10/25

विषय-- मनाचे तारुण्य 

शीर्षक--सकारात्मकता

मन कशाकशाचे मिश्रण
काम क्रोध लोभ मायाचं
जगताना असे समिश्रण
बंधन नसे त्याला कशाचं. १

    मनात चाले ताण तणाव
    स्नेहभरे रोगाला आमंत्रण
    यासाठी ठेवावं सुदृढ मन        
    उत्तम आरोग्याला निमंत्रण.२

गोड कडू अनुभूतीने मन
होई कधी दुःखी  आनंदी
तरीसुद्धा मन ठेवता स्थिर
जीवन बने सुंदर स्वानंदी.३

     बहिणाबाई म्हणे मन वढाय
     प्रचिती सदा जगताना येती
     क्षणात घरात दारा आकाशी
     भरारी घेत घेत असे फिरती.४

शरीर ठेवण्यासाठी चिरतरु
मनात विचार सकारात्मक
अनुकूल प्रतिकूलता नको
मन सदा ठेवावे स्थिरात्मक.५

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!