उपक्रम__ प्रेम काव्यविषय -हात तुझा हातात असावाहात तुझा हातात असावा
🙏🏻काव्य बहर साहित्य मंच,
उपक्रम__ प्रेम काव्य
विषय -हात तुझा हातात असावा
हात तुझा हातात असावा
साथ तुझी जीवनी मिळावी
घेत महात्मा फुलेचा वसा
घराघरात सावित्री घडवावी.१
काट्यात ही गुलाब फुलतात
नकारात ही होकार दिसतात
जरी संकटे घेरती सदा मला
जसे बाबासाहेब मम् भेटतात.२
सदा वाट पाहणारी ती राधा
कृष्ण येताच कावरी बावरी
हा भाव मम मनी सदा असे
विरहा समयी मना सावरी.३
सात जन्मी तुझा सहवास
वड पूजनी मागते सौभाग्य
सुखदुःखात बरोबर राहतो
हे माझे आहे परमभाग्य.४
संसार हा आपल्या दोघांचा
मी जेव्हा जेव्हा पसरवला
कधीच रागे न भरता तू
संयमात आनंदान सावरला.५
येता बोलवणे अज्ञात दिशेने
निरोप देऊ घेऊ समभावाने
आलेला जाणार असतो हे
दाखविले त्रिकालबाधि सत्यने.
हाती हात घेऊनी तू माझ्या
सहवासी सुखदुःखे रमला
जरी चुकलो असेल आपण
क्षमवीरस्य भूषणाने चालला.७
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे