विषय -- महानवमी महा नवमीचा दिन आला

विषय -- महानवमी 

महा नवमीचा दिन आला  
सर्वांनाच आनंद हो झाला
नवरात्रीचे नऊ दिवस व्रत
वैकल्याने पुण्यार्जनी केला.. 
जिथे तिथे दिसतातच माते
खुणा तुझ्याच अस्तित्वाच्या
तुझा आशिर्वाद असे आई
कांक्षा उज्वल भविष्यांच्या.. 
आंबे अरूड होता सिंहासनी
नवदुर्गाचा संचार अंगी साठे
किती जयविजय झाला तरी
तुजविण हरल्यासारखे वाटे.. 
महानवमी खंडे नवमी करूया
शस्त्र पूजा पाठ वंदू सरस्वती
आनंद चैतन्या सदा मिळे गती
 राहू दे छत्र छाया हे भगवती.. 
भक्तीभावे माता तुझा जागर
आनंदे घट विसर्जन सोहळा 
ऊर्जा सद्बुद्धी दे सर्वांना माते
हर्षाने झाल्या सुवासिनी गोळा.. 

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण