विषय _देवीची ओटी*

*काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित देवी नवरात्री निमित्ताने विशेष काव्य लेखन उपक्रम*

*विषय _देवीची ओटी* 


ओटी भरू शेतकरीण देवीची
साडी खण नारळ जोंधळ्याची
सदा राहण्या तूच सौभाग्यवती 
हीच राहो कृपा वरून राजाची.
 १

 वकालत देवीची भरू ओटी
खऱ्याचं खरं, खोट्याचं खोटं     
वकालत करून या सुदृढतेने 
न्यायदेवतेच मन होत  मोठं..

ओटी भरूया  शिक्षिका देवीची
प्रेमाचे हळकुंड ज्ञानाचा दिवा
कुटुंबात समाजात सर्वांसाठी
मन स्वास्थ्याचा असे हा ठेवा..

ओटी भरू परिचारक देवीची
समाजसेवा करते आरोग्याची    काळजी नर्स  वैद्यकिय सेवेची
सदाधडपड निरोगी ठेवण्याची..

ओटी भरू आईरूपात देवीची
बदाम खारीक खोबरं घालून
काळजी घरातल्या लोकांची
नका बोलू तिला घालून पाडून.. ५.

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण