सामाजिक काव्य)**विषय - शोध अस्तित्वाचा*

*काव्यबहर साहित्य मंच,भंडारा आयोजित उपक्रम क्र.१०१३दि.०९/०९/२०२५ मंगळवार (सामाजिक काव्य)*

*विषय - शोध अस्तित्वाचा*

जन्म  मानवाचा मिळाला
त्याचे सार्थक ते करावे
शोध  स्वतःच्या अस्तित्वाचा
घेत घेत जगती जगावे.. १

        पुण्य कर्मानेच मिळाला
        जन्म मानव आपणास
        करा हो चिंतन मंथन 
        सुखी जीवनचा प्रवास..२

श्रद्धा अंधश्रद्धा दोन्हीत 
असे  रेषा ती पुसटशी 
मना विचार कर सदा
लढ सत्याच्या अस्तित्वाशी..३

     जागरूक राहून जोड
     घाला हो ज्ञान विज्ञानाची
     बाप  दाखव नाही तर
     श्राद्ध घाल कास सत्याची.. ४

स्वतःठेवता हो झाकून
वृत्ती ही चांगली नसते
दुसऱ्याचे पहा  वाकून
वृथा ही सवय असते..५

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे