शब्दकवींचे :- कवी गुरु ठाकूर यांची शब्द ओळ**विषय :- जगण्याला श्रावण म्हणतो*

*काव्यबहर साहित्य मंच, भंडारा.*
*दिनांक :- ०८.०९.२०२५ (सोमवार)*
*उपक्रम क्रमांक :- १०१२ (कवी विशेष काव्य)*
*शब्दकवींचे :- कवी गुरु ठाकूर यांची शब्द ओळ*
*विषय :- जगण्याला श्रावण म्हणतो*
           

जगण्याला श्रावण म्हणतो
जगणे सुखदुःखाचा खेळ
निसर्गाकडून शिकत जावे
घालत जा जगण्याचा मेळ.. १

निसर्ग सांगे जे आहे ते देत
जावे,सदा क्रियाशील रहावे
कीर्ती पसरे ती असमंताशी
आहे ते देत परमेश्वरा स्मरावे..२

उदास होतं उसवले मन माझे
श्रावणाने छान बहरून आले
आठवणीं च्या हिंदोळ्या वर
मन झोक्यावर झूलू लागले.. 3

दुष्काळाचा सुकाळ करणारा
वृक्षा रोपणास तो महत्त्वाचा
श्रावण मासी हर्ष मनामनाशी
ऋतु राजा श्रावण आनंदाचा.. ४

श्रावण सांगे प्रेम द्यावे घ्यावे
सुखी संसाराचा मंत्र जपावा
परोपकारी आनंदाने जगावे
जीवनी श्रावण सदा उतरावा.. ५

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!