आवडती काव्यरचनाविषय..फुलाचे निर्मल्य

आवडती काव्यरचना

विषय..फुलाचे निर्मल्य

मोगऱ्याचाच गजरा
तू कुंथलात माळला 
मम् नयनाच्या दर्पणी
हात घातला मनाला..१

होई नजरा नजर
लाजता मी गालात
वाजे प्रेमाचा गजर
छनाने  अंतर्मनात.. २

सख्या मज हसल्या
मन थरथरले अधर
फुलता मोगरा होई
धुंद गंधाची कदर.. ३

सख्या तुझ्या विरहात
स्वप्न मज होते पडले
फुलला मोगरा पाहून
तुम्ही दर्पणी दिसले.. ४

गांभीर्य समजावूनी घ्या
मोगऱ्याचे फुलून होई 
निर्माल्य,मानवा तु ही
वास्तवता जाणून घेई.. ५

जीवन हे बहु सुंदर
परोपकाराने पावन
कर जगणे सुगंधमय
सार्थकी लाव जीवन..६

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे.

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!