ऋणनिर्देश *बाप्पा चालले गावाला*
ऋणनिर्देश
*बाप्पा चालले गावाला*
संपूर्ण जग त्या अनंतानी भरलेले आहे , दाही दिशेला आपण अनंत चतुर्दशी साजरी करतो. आपल्या ग्रुप वरती आपण दररोज वेगवेगळे विषय देऊन साजरी केली.
गणपती बाप्पाला आपण त्या सागरात अनंतात विलीन करतो व विश्वस्वरूप जगण्यासाठी नामी जीवन देतो.
मूर्तीला विसर्जन करून अमूर्त जीवन जगण्याची ईच्छा प्रगट करतो. म्हणून रोजच दहा दिवस गणपती बाप्पा वर वेगवेगळे विषय देऊन सर्व सारस्वतांनी या विद्यादेवतेला शब्द पूजेने पूजले आहे. ही संधी ग्रुप चालकांनी सर्वांना उपलब्ध करून दिली.
तुझ्या कृपेने दिन उगवे हा ,करुनि तव भजना वंदितो तुजला गजवदना...
तू विद्येचा स्वामी दाता ,तू सकलांचा भाग्य विधाता ....... हाच तो आनंद ज्याचा शोध युगानुयुगे आपल मन आपली बुद्धी घेत आली आहे ....
याच साठी आपला जीवात्मा जन्मावर जन्म घेऊन
तो परम आनंद शोधत आहे.
ज्यांना तो आनंद भेटला त्यांनी शब्दात मांडला. सुंदर कविता करून आपले भाव शब्द रुपी फुलाने, भक्तीने समर्पित केले. कोणी शरीर साक्षात परमेश्वर तर कोणी आपण जीव नाहीत शिव आहोत. निसर्ग आहोत. तर बाप्पा सांगून गेले पिंडी ते ब्रम्हाडी तुम्ही तत्व आहात.
एकुम बहुस्यांम
तुम्ही 5 तत्व आहात
तुम्ही साक्षात आत्मतत्त्व आहात.
जन नव्हे जनार्दन आहात. हे सांगून गणपती बाप्पा अनंतात विलीन झाले. अनंत चतुदशी साजरी करू गणपती बाप्पा मोरया या वर्षी माझ्या बुद्धीने स्वीकारले नाही अनंताला तर बाप्पा पुढल्या वर्षी लवकर या----वाट पाहत आहे. मी बाळ अज्ञान मज बुद्धी द्यावी.......
गणपती बाप्पा ,गणपती बाप्पा सर्वांगसुंदर गणपती बाप्पा तुझी सेवा करताना काही चुक भूल झाली तर क्षमा असावी बाप्पा अनंत चतुर्दशी
गणपती बाप्पा निरोप घेतो आहे.अर्थातच
आपल्या काव्य बहर समुहात मोठ्या थाटामाटात गणपती उत्सव नियोजीत वेळेत ठरल्याप्रमाणे आनंदाने उत्साहाने शब्दांच्या पूजेने थाटामाटात संपन्न झाला. बाप्पा जायचं म्हटलं की मनात उदासी भरते आणि त्याच्या विरहान मन व्याकूळ होतं. चुकले असेल तर माफ करा .मोरया आपल्या या सारस्वत भक्तांना 🙏निरंतर तुझा आशिर्वाद पाठीशी असू दे. ढोलताशांच्या गजरात बाप्पाची छान मिरवणूक काढण्यात आली.
सन्माननीय कविवर्य ताकधड कांकाच्या कविता अतिशय सुंदर.त्याला चाल लावणा-या आपल्या समुह संचालीका मा. अर्चना ताई गुरुवे यांनी सुरेख चाल लाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले
एकंदरीत हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. कविराज राजकुमार कुटे सर्व कवी लेखकांचे व सर्व टीमचे मनःपूर्वक धन्यवाद आणि ऋणनिर्देश व्यक्त करते .
काव्यबहर साहित्य मंच सदस्या
प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे.