घरोघरी घटस्थापना**काव्यप्रकार-अभंग*

*घरोघरी घटस्थापना*

*काव्यप्रकार-अभंग*

घटस्थापना ती l अश्विन मासात।
प्रथम पुजत l घरी माता ।।१।।

साडेतीन पीठे lघरामध्ये आई l
मुलगी ती माई l ती बहीण।।२।।

घरी कुलस्वामिl असे अन्नपूर्णा  
तृप्ती ती सर्वांना। भोजनाने।३।।

अभ्यास घेताना l असे सरस्वती
अवतीभवती l  जाण ठेवा ।।४।।

तुळजापूराची। ही भवानीमाता
  काळजी घ्याआताl प्रेम भरे।।५।l

गृहलक्ष्मी घरीl सन्मानाने राहोl
घरोघरी लाहो l काली बनो।।६।।

सदा आत्मभान।जागवावे स्त्रीचे। 
बाई मानवाचे। सन्मानाने।।७।।

गरबा रास तो। मंगलम होवो। 
शिव्याच न देवो।  मायवरी।। ८।। 

भजू तिज आता। नवदुर्गा घरी
नवरात्र दारी।भक्तीभावे।।९।।

प्रा.सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता