अर्लियन के ए अध्यात्मक पुणे प्रतिष्ठान आयोजितभटकंती
अर्लियन के ए अध्यात्मक पुणे प्रतिष्ठान आयोजित
भटकंती
रोज भटकंती आई
तुला पाहण्यासाठी
हाक मारून थकले
ओढ भेटण्यासाठी. १
आता दिसत नाही,
अश्रू येई डोळ्यात
मन सदा भटकते
तुलाच शोधण्यात.. २
आई सहवास नाही
मला याचा त्रास होतो
मनाला तुझा आठव
भास क्षणाक्षणा होतो..३
भटकंती करताना
मुलीत भेटली आई
चेहरा तिचा बोलला
काळजी नको बाई.. ४
जन्मलेला जाणारच
निसर्ग नियम आहे
सर्वांची आई जगदंबा
आशीर्वाद देत राहे.. ५
नवरात्र आदिशक्ती
माता करे परिभ्रमण
दृष्ट प्रवृत्तीचा नाश
करून ते येई शरण.. ६
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे