विषय- करावा सन्मान शिक्षकांचा*
*काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित शुक्रवारचा उपक्रम क्र.१००९ दि.५/९/२५ शुक्रवार*
*विषय- करावा सन्मान शिक्षकांचा*
राष्ट्राचे भविष्य घडवितात गुरु
पांढऱ्याच पोशाखातील तुम्ही
करतो सन्मान सर्व शिक्षकांचा
स्नेहभावआदर बाळगत आम्ही.१
तुमची प्रत्येक कृती आम्हासाठी
यशस्वी जगण्याचा तो दीपस्तंभ
तुमच्या ज्ञानदानाच्या सत कृतीत
परोपकारान जगण्याचा आरंभ.२
आठवण सर्वपल्ली राधाकृष्णची
संस्काराची शिदोरी मूल्याचे धडे
आजच्या हरवलेल्या नीतीमूल्यास
सावरताना गुरुच्या जगण्यास तडे. ३
आजही आठवतात ते शाळेचे
हरहुन्नरी आनंदी रममान दिन
एकात्मता राष्ट्रप्रेम जागवताना
आईवडील गुरुशी राहतो लीन.४
आपल्या कृपेनं घेत उंच भरारी
पाय जमिनीवर हात ते आकाशी
आई बाबा गुरु आपलं सारं श्रेय
विद्यादानानं उज्वल भविष्यराशी. ५
तुमच्या आठवाण मन भरून येतं
करतो आई वडील गुरुचा सन्मान
कृतज्ञतेचा भाव व्यक्त करतानाही
तुमचा आम्हास वाटतो अभिमान. ६
गुरुजी तुमच्यापेक्षा आम्ही मोठे होण्यासाठी सदा तुमची धडपड
अ आ इ ई पासून शिकवताना
मजवर कधी नाही केली तडतड.७
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे