विषय.. गरबा, दांडिया

काव्यबहर साहित्य मंच भंडारा आयोजित उपक्रम..नवरात्रोत्सव  
विषय.. गरबा, दांडिया 
उपक्रम क्रमांक..१०३६

नवरात्रीच्या नऊ दिवसात
खेळतो रासगरबा दांडिया
भक्ती करूयात मनोभावे
सारे मिळून पुरुष स्त्रिया.. 
१
घूमर गरबा दांडिया हादगा 
विविध राज्य विविध खेळ 
भक्तीच्या पवित्र भावनेतून
दिसे संस्कृतीचा ताल मेळ.. 
२
समृद्धीचे लक्षण हत्ती मध्ये  
ठेवत पूजन करत तालावर
लयबद्ध असा हा पदन्यास 
विविध वाद्यावर गाण्यावर.. 
३
अशा वेळी कुमारीका पूजन
होने समाजातील धर्म प्रवृत्ती  
अनेक कुमारी का गर्भवती ?
दांड्या खेळाताना हो विकृती.. 
४
यामुळेच पुढे होतात गर्भपात
चिमूरड्या जीवांवरच  आघात
हा अहवाल वैद्यकीय संस्थेचा
मोडून काढायला हवेत प्रघात..
 ५
माफ करा, या पवित्र नवरात्रीचे
आपण बाजारीकरण थांबवूया
विकृत अंधश्रद्धेस तडा देऊया
आईस संस्कारचा जोगवा मागूया..
६
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता