विषय* कुमारीपूजन

ArLiEn ,,कवियों का अध्यात्म 
 आयोजित 

*उपक्रम* 98(29/8/25)

*विषय* कुमारीपूजन 

नवरात्रीत देवीचा जागर
करतात बंधू अन् भगिनी
माळ आठवी कन्यापूजन
कोमार्य असते ती रागिनी.
१
दुर्गाष्टमीला कन्या पूजती
बालकुमारीकास बोलवती
प्रेमाने त्यांचा करे सन्मान
देवीचा अंश त्यांना मानती. 
२
कन्याच असे निखळ उत्साह
निखळ खळणारा जणू झरा
आजची कन्या उद्याची स्नुषा
उद्धार करे दोन कुळांच्या घरा. 
३
तुलनात्मक स्त्री-पुरुषांमध्ये
कन्यां संख्या का आहे कमी? 
विचार करा सर्वांनी वंशाला 
दिवा आणणार कुठून आम्ही? 
४
कळीला जन्मू द्या उमलू उद्या
उमलण्या आधीच नका तोडू
असमतोल दूर करण्यासाठी
जन्मा येण्याआधी नका खुडू. 
५
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता