जोगवा*

*💐 काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित बुधवार दिनांक २४-९-२०२५ चे दैनिक उपक्रम क्रमांक १०३०💐*
*जोगवा*
 आईचा जोगवा जोगवा मागते
 आत्मभानाचे कवाड जागवते. 
१
भवानी आई जोगवा मी मागते
मम् स्वैराचारी वृत्तीला सोडिते .
 २
हे शारदे ज्ञानाचा जोगवा  मागते
सत् विवेकाने ज्ञानज्योत तेवीते.
३ 
महालक्ष्मी अर्थार्जनाचा मी मागते           
जोगवा मनीचा भाव तुला सांगते
४
कालीका माता जोगवा मी मागते 
 दृष्टांवरप्रहार करण्या बळ तू देते
५
रेणुका माता जोगवा मी मागते
कर्तव्य करत हक्कासाठी भांडते
६
दुर्गा, जोगवा मानवतेचा मागते
तू दिलेली आदिशक्ती मी जागवते
७
अन्नपूर्णा माता जोगवा मी मागते
सुदृढ शरीरासाठी मनास भावते
८

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता