विषय:-- *देवीची नऊ रुपे*

*💐 काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित बुधवार दिनांक २४-९-२०२५ चे दैनिक उपक्रम क्रमांक १०३०💐*
विषय:--  *देवीची नऊ रुपे*

देवीची नऊ रुपे  दिसतात छान
पेटवे शिक्षणाची ती क्रांती ज्योत
सावित्रा ठेवे स्त्रिया शुद्रांचं भान
उजळे ज्ञानज्योत घरोघरी श्रोत.
 १.
नमन करूया झाशीच्या राणीला
पाठीपुत्रासवे शत्रूशी लढण्याला
नमू अहिल्याबाईच्या कर्तुत्वाला
हिमकन्या शिवपत्नी शैलपुत्रीला. 
२.
नमन करू जिजाऊ राजमातेला
घडविले तिने वीर पुत्र शिवबाला
शत्रूचा नाश करत त्यानी कपाळी
धारली चंद्रकोर जणू चंद्रघाटाला. 
३.
सिद्धीरात्री तीच दुर्गा अंबा माता
महागौरी कालरात्रीचं स्कंदमाता
ताराबाई सुनिता विल्यमची गाथा
घरी लक्ष्मी सरस्वती पुजा आता.
 ४
घरीदारी ती रूपे पोलीस महिला
किरणबेदी मर्दानी जागरभक्तीचा
आई जोगवा मागते सत् बुद्धीचा
उद्धार कर दुर्लक्षित स्त्रीशक्तीचा.
तू जग कल्याणकारी तू गृहलक्ष्मी
शांती क्रांती बुद्धी रूपे तुझं नमो
भक्ती शक्ती युक्ती रूपे ही तू रमो
अंबे आदर करण्या सर्वांना जमो. 
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!