विषय :- मित्र मोबाईल शीर्षक:-मित्रसखा
अर्लियन के ए अध्यात्म पुणे प्रतिष्ठान आयोजित
उपक्रम क्रमांक ९०
विषय :- मित्र मोबाईल
शीर्षक:-मित्रसखा
नवनव्या गोष्टी शिकत जावे
मोबाईल पासून घ्यावा बोध
जग सर्वांच्या मुठीतच आले
आभार त्यांचे लावला शोध.. १
व्हाट्सअप वर मिळे माहिती
ज्ञान अर्जनाची वाढवे हो मती
गुगलचे बोट धरू जगी फिरवी
प्रबंध लिहिण्यास वाढवे गती..२
सर्वांचाच आहे हा सखा मित्र
नसेल जवळ तर करमत नाही
त्यामुळे जगण्याचं बदले चित्र
जीवनी आनंदी राहण्या पाही.. ३
म्हणे तरुणांना बिघडवण्याचं
पिटुकला मोबाईल काम करतो
विचार करून जगी वापरल्यास
जीवन सावरण्याशी स्मरतो..४
हातळून त्याला योग्य प्रकारे
करून घ्या सदा आपले काम
प्रत्येकामध्ये असतात गुणदोष
गुणग्राहकता ठेवून म्हणा राम..५
प्रा.सुरेखा कटारिया चिंचवड पुणे