चित्र काव्य -अष्टाक्षरी *दीपस्तंभ*

साहित्य सुरभि
दि. १९. ९. २५

चित्र काव्य -अष्टाक्षरी
 *दीपस्तंभ*

संसाराच्या सागरात
असे समस्याचा भार
समाधान समस्याचे
दीपस्तंभ हा आधार ..१

तेजोमय दीपस्तंभ
वाट दाखवी जगाला
नका घाबरू प्रश्नांस
ठणकावा हो मनाला.. २

गुज आपल्या स्वप्नांचे
पूर्ण  करण्यास खास
करा हो अनुकरण
थोर मोठ्यांची आस..३

दिशाहीन जीवनात
थोरांचेही अनुभव
करुनिया अनुकृती
माणसाचा सुस्वभाव.. ४

जेथे षडरिपू  त्याग
तेथे मार्ग सुखकर
राग द्वेष मोह माया
समस्याचा ना विकार.. ५

परिग्रह कमी करा
साधुसंत सांगे जगा
हर्ष भरे जगण्यास
सत्य अहिंसाने वागा.. 

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता