विषय :-- वर्धापन दिन काव्यबहरचा*
*विषय :-- वर्धापन दिन काव्यबहरचा*
जेथे येतो काव्याला सदा बहर
करतात सरस्वतीचे आराधना
तेथे होय सदा शब्दांचा शृंगार
करत नाही सारस्वत विराधना..१
मुरकुटे सरांच्या मार्गदर्शनानं
काव्यबहर मंच होई शानदार
मंचाची पाळली जातात बंधने
कविता मंचावर येते बहारदार..२
सर्वांवर लीला करत लीलाधर
सन्मानपत्र बनवून देतात छान
सारस्वतांचे कौतुक अर्चनाताई
करत प्रेरणा देण्याचे ठेवी भाण..३
विविध वाक्प्रचार म्हणीने सजते
जेव्हा कविता,फारच छान,भव्य
मुरकुटे सर देतात सदा अभिप्राय
शब्द शृंगार करत सजते काव्य..४
या वर्धापन दिनाच्या देऊ खूप
खूप शुभेच्छा ! चारोळी गाणी
एक ना अनेक उपक्रम सर्वांच्या साह्याने फळे सारस्वतांची वाणी.. ५
प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे