विषय: कवयित्री स्पृहा जोशी यांची शब्द ओळ विस्तीर्ण नभाच्या खाली शीर्षक:भरारी

काव्य बहर साहित्य मंच आयोजित 
विषय: कवयित्री स्पृहा जोशी यांची शब्द ओळ
 विस्तीर्ण नभाच्या खाली 

शीर्षक:भरारी

व्वा.!विस्तीर्ण नभाच्या खाली
मी स्वतःच स्वतःला  निरखावे
दिलखुलास  घेऊनी प्राणवायू
पक्षासम सदा आनंदे बागडावे.. १

बिना खांबाच्या नभा पहावे
गुणग्राहकता ठेवुनी  जनाने
आनंदी जीवन जगत रहावे
समर्पित रहावे जनात मनाने.. २

अनेक सूर्य चंद्र तारे नभवरी
हवा पाणी प्रकाश फळे फुले
देत राहतात सदा या  धरावरी
निसर्ग शक्ती या धर्तीवर झुले..३

 देणे त्यांचे पाहुनी सदा द्यावे
जगी उंच उंच भरारी घेताना
इंद्रधनुष्यासम सदा चमकावे
बिलगून आनंदाच्या थेंबांना.. ४

या विस्तीर्ण नभाने कवितेस
माझ्या  सहजीच ललकारावे
शब्दांच्या रीमझीम पावसात
वीज कडाडून कवितेत भेटावे.. ५

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता