उपक्रम क्रमांक ७९ विषय - पत्ते

अर्लियन के ए अध्यात्म प्रतीष्टान 
उपक्रम क्रमांक ७९
 विषय - पत्ते

जगणं आहे पत्त्यांचाच डाव 
धकाधकीच्या या जगण्यात
सावधान राहूनच निर्णय तो 
घ्या विवेक ठेवून वागण्यात.. १

आयुष्याचा खेळ जीवघेणा  
जीवनात निर्व्यसनीच राहणे 
पत्त्यातील हा हुकमी एक्का
आयुष्य गायी सुखाचे तराणे.. २

राजाराणी परिवार सहितच 
संसाररुपी सागरामध्ये सुखी
दुःखात सुद्धा जोकर असतो
जगताना आनंदी सदासुखी.. ३

लोक काय म्हणतील याचा 
विचार न करता दुर्लक्ष करा 
नकारास,दुजा बदलण्यापेक्षा
स्वतःला बदल करण्या स्मरा..४

पत्ते हे जगण्याचा सुंदर डाव
सामंजस्याने खेळला पाहिजे 
खरं खोटंयापेक्षा खरं ते माझं 
म्हणत जगता आलच साहिजे.. ५
 
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे