अर्लियन के.ए अध्यात्म पुणे प्रतिष्ठान उपक्रम नं 86विषय -मुखवटे

अर्लियन के.ए अध्यात्म पुणे प्रतिष्ठान उपक्रम नं 86
विषय -मुखवटे  
अष्टाक्षरी

जगी वावरतानाही
दिसतात मुखवटे
आत एक नी बाहेर
एक, होई दुखवटे.. १

मुखवटे घालूनिया
जगणाऱ्या माणसाची
एक बात दहा हात
कथा ही नव्या पिढीची.. २

स्वातंत्र्याचा स्वैराचार
पॅन्ट फटकी नेसून
वेश करे भिकाऱ्यांचा
बोले  घालून पाडून.. ३

रावणाने बदलून
मुखवटा केले होते
सीता हरण,खोट्याने
खरे फसविले जाते.. ४

राम कृष्ण आठवता
सत्य अहिंसाची कास
खरे खऱ्याचे  असते
तेथे  ईश्वराचा वास.. ५

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता