रक्षाबंधनानिमित्त विशेष उपक्रम विषय :-राखीचा प्रेमधागा*रक्षाबंधन

*रक्षाबंधनानिमित्त विशेष उपक्रम*
     *********************
*विषय :-राखीचा प्रेमधागा*
रक्षाबंधन

    राखीपौर्णिमा धागा प्रेमाचा
बंध बांधूया रक्षा करण्याचा
    नयनाच्या करूनीया ज्योती
निरपेक्षतेनं ओवाळण्याचा.. १

     बंधू सखा कृष्ण द्रौपदीचा
वेळेस पाठी उभा राहणारा
    प्रेमाचा धागा तो विश्वासाचा
एकमेकाचे रक्षण करणारा.. २

     उदार हस्ते आशीर्वाद  बंधूला
निरामय दीर्घायु तुझसी मिळो 
      कीर्ती  तिन्ही लोकी झळको
तुझ्या वरील इडापिडा टळो..३

      कधीच तुझंकडून ना अपेक्षा
 करत नाही तू आमची उपेक्षा
      बांधण्या रक्षा बंधनाचा धागा
 करते तुझी येण्याची प्रतीक्षा.. ४

       आठवणीने मन भरून येते
तुझं भेटण्या आस मनी तेवते
      खास बंधू-भगिनीच्या प्रेमाचे
लाभो यशकीर्ती मागणे मागते..५

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे