आजचा उपक्रम- प्रेमकाव्य ,स्वप्न सुखी संसाराचेअष्टाक्षरी

आजचा उपक्रम- प्रेमकाव्य ,स्वप्न सुखी संसाराचे
अष्टाक्षरी

स्वप्न सुखी आयुष्याचे
प्रेम स्नेह बंधनाचे
प्रत्येकाच्या मनी बसे
मर्मबंध सलोख्याचे.. १

तिच्या स्वप्नातला राजा
समजून घेतो तिला
प्रेम करे सदा,असा
मिळो जोडीदार मला..२

सदा आनंदी ठेवण्या
घ्यावी काळजी घरात
वय झालेल्या पानांची 
बोला सौम्य सुस्वरात..३

करा आदर वृद्धांचा
घेत काळजी छोट्यांची 
बहरून जाई घर
हमी मिळे आनंदाची .. ४

झाडावर माडावर
प्रेम पशु पक्षावर
सदा मायाळू असावे
खूप जिव्हाळा त्यावर..५

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता