आजची म्हण:--- *अल्प बुध्दी बहु गर्वी
*💐 काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित गुरुवार दिनांक २१-८-२०२५ चा दैनिक उपक्रम क्रमांक ९९४💐*
उपक्रम * *मराठी म्हणी नुसार काव्य लिहीणे*
आजची म्हण:--- *अल्प बुध्दी बहु गर्वी*
अल्प बुध्दी बहु गर्वी
येई अनुभव अशांचे
नकारात्मक अविचार
अल्प बुद्धीवाल्यांचे.. १
संत सांगतात,उथळ
पाण्याला खळखळाट
फार, मी म्हणेल तेच
खरे,घेतात तळतळाट? २
शहाण्याचं चाकर व्हावं
वेड्याचं धनी होऊ नये
ते अल्प बुद्धी बहु गर्वी
नादी त्यांच्या लागू नये.. ३
समज यांचा सदा असतो
मलाच कळतं सर्व काही
मोठा आवाज करत सदा
पुढे पुढे करण्याची घाई. . ४
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे