विषय :- देश तसा वेश**अर्थ :- परिस्थितीनुसार स्वतःला बदलणे* *(छोटा अभंग काव्यप्रकार)*

*काव्यबहर साहित्य मंच, भंडारा*
*विषय :- देश तसा वेश*
*अर्थ :- परिस्थितीनुसार स्वतःला बदलणे*
         *(छोटा अभंग काव्यप्रकार)*

राहा देश तसा वेश
संस्कृतीचाच आदेश..१ 

विचारातून आचार
सदा काळ सदाचार.. २

प्रेम जिव्हाळा वासल्य
जीवनी येते मांगल्य.. ३ 

सदा सर्व नम्र राहा
आनंद जीवनी पहा.. ४

सुकर्म ठरवे न्याय
कुकर्म सांगे अन्याय.. ५

सत्कर्म  मोक्षाची वाट
 पाप नरकाचा घाट.. ६

खूप भाषा खूप देश 
 परंपरेचा संदेश.. ७

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता