विषय :- संपलेला गोतावळा छोटा अभंग काव्यप्रकार

*काव्यबहर साहित्य मंच, भंडारा.*
*दिनांक :- ०५.०८.२०२५ (मंगळवार)*
*उपक्रम क्रमांक :- ९७८ (सामाजिक काव्य)*
*विषय :- संपलेला गोतावळा छोटा अभंग काव्यप्रकार
संपलेला गोतावळा
कलियुगी वानवळा.. १

कमी झाली आपुलकी
नसे उरे माणुसकी.. २

व्यक्ती स्वतःमध्ये मस्त
नाही घेणे देणे  व्यस्त.. ३

तीच हवा तेच पाणी
मग का बदले वाणी?.. ४
 
तेच अन्नपाणी घेतो
नकाराचे गीत गातो.. ५

अर्धा ग्लास भरला हो
अर्धा ग्लास सरला हो.. ६

बघा पूर्ण ग्लासाकडे
द्यावे नकाराला तडे.. ७

आहे जीवन  सुंदर 
फिरा सदा जगभर..८

होकाराचा लावा सूर
ठेवा नकाराला  दूर.. ९

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता