नाट्यछटाम्हणे उपद्व्यापी मुले...! कीर्तनकार डॉ. श्वेता राठोड

नाट्यछटा

म्हणे उपद्व्यापी मुले...! 

कीर्तनकार डॉ. श्वेता राठोड

अरे निमांश काय करतोय? काय करतोस म्हणून काय विचारतोस ? शाळेला उशीर होतोय घाई घाईने दप्तर भरतोय आई डबा देते ना रे तेव्हा आईच आपल नेहमीचे पालुपद निमांश वहया, पुस्तक,वेळापत्रकाप्रमाणे दप्तरात भर काही विसरू नको.उगाच बोजा वाहू नको.
       अगं आई मी तसचं करतोय। तर म्हणते कशी मागच्या पालक सभेत तुझ्या वर्गशिक्षका तुझ्याबदद्ल तकार करत होत्या.तुमचा निमांश वर्गात पुस्तक आणत नाही.गृहपाठ कधी करतो.कधी करत नाही. वर्गात सारखा खोड्या करतो.आईचा एकसारखा पाढा सुरूच होता
         तुला माहित आहे.बाईंना सवयच आहे तकार करण्याची.त्या नेहमी आपल्या म्हणत असतात, "कठिण गं बाई कठिणं आहे या पोराच। कसं होईल कोण जाणे"? हे आईलाही मी सांगितले, तर आई म्हणते कशी त्या काय उगीचचं म्हणतात का?
        तुम्ही मुल तशीच वात्रट उपद्व्यापी आहात.परवा म्हणे डब्यात झुरळ घेऊन गेला होतास.वर्गात पोरांना दाखवत होतास.पोरी झुरळ पाहून किंचाळल्या.बाईनी पाहिल तर त्याही किंचाळल्या अन् तुम्ही हसत राहिला. हसू नाहि तर काय करू? 
नेहमी मी कोणाला घाबरत नाही असं म्हणा-या बाई झुरळाला घाबरतात मग मला हसू येईल नाही तर काय ?
    त्यात साहिलने धक्का दिला अन तो डब्बा खाली पडला सगळ्या वर्गात झुरळ झाली, पोरी बाई पळत सुटल्या; मग तर माझी हसून हसून पुरे वाट झाली.आता तुच सांग काय चुकल माझ..? प्रयोग शाळेत लागत होती म्हणून घेऊन गेलो. तर आई  रागवते. कस वागावं तेच मला कळत नाही? मी का झुरळाचा डब्बा पाडला ?त्या साहिलच्या धक्याने पडला कोण चुकतो?

मला आपली विज्ञानाची आवड त्यात प्रयोग करायला आवडतात म्हणून चार बेडूक एकदा पिशवीत घालून दप्तरात आणले होते. कसा कोण जाणे एक बेडूक टुणकण उडी मारून खाली आला तर आई म्हणते तू पिशवीतून बेडूक नेलास अन् वर्गात सोडलास. 
मी सोडला नाही. मी  ओरडून सांगतोय पण ऐकतोय कोण ?विनम्रपणे मी सांगत होतो. एकदम दुणकण उडी मारून तोच दप्तराच्या पिशवीतून बाहेर आला. सगळ्या वर्गात पळापळ मी काय करू? तर म्हणते कशी यालाच उपद्व्याप म्हणतात. आईने आवाज चढवला नेहमी सारख .रागावू लागली. आणि म्हणू लागली."निमांश, आता नविन बाई येणार आहेत ना तुमच्या वर्गात?"
 मी म्हणालो, "त्यांचा पहिलाच तास आहे."
             तर म्हणते कशी, शहाण्यासारखे वाग त्यांना त्रास देवू नकोस. पुन्हा माझ्याकडे तकरार येता कामा नये. नाही तर माझ्याशी गाठ आहे. लक्षात ठेव. 

      मी हो म्हंटल, कारण आई हा असा दम मला नेहमीच देते; पण करीत काहीच नाही.मला ठावूक होत मी हो म्हणून वेळ टोलवली. 
     खरं तर मला तस काहीच करायच नसत. पण खेळण्याच्या गडबडीत कधी कधी घोटाळा होतो. एखादे पुस्तक,वही गृहपाठ वही,दप्तरात घालायला विसरतो; पण त्यान माझ काही अडत नाही. अभ्यासाच्या वेळी मी दुसरी वही किंवा पुस्तक काढून तोंडासमोर पकडतो. बाईंना काही कळत नाही थांग पत्ताच लागत नाही. पण आमच्या वर्गातली कार्टी फार खडूस, लगेच बाईंना जाऊन सांगतात. 
"बाई बाई तो निमांश बघा, काय वाचतोय? मग काय पहिल्याच तासाला नव्या बाईंच्या हातचा धमक लाडू मिळाला अशी ही पोर्टी मला सतावतात. "

एकदा बाईंनी वाचन घेतल वर्गातली मुल आळी पाळीने वाचू लागली. माझं पुस्तक नेहमी प्रमाणे दप्तरात नव्हतं.माझ्या मागच्या बाकावर तानाजी धावडे बसायचा मी हळूच त्याच पुस्तक पळवल. आत्ताच काम भागल पुस्तक त्याला सापडेना म्हणून तो गडबडला. बाईंनी त्याचा कान पिरगळला मग त्याने बाईना माझी तकार केली. मला बाई खूप बोलल्या. 
आता तुच सांग माझ नाव सांगायच त्या तान्याच काय नडल होत का ? पण नाही तो ही लेकाचा एक नंबरचा खडूस..!पुन्हा म्हणतात, ही मुल की नाही खूप खोडसाळ,उपद्व्यापी मलाच माझं कळत नाही. ही लोक माझ्याशी असं का वागतात.

लेखिका- कीर्तनकार डॉ. श्वेता राठोड
मोबाईल नंबर 9922745030

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!