विषय _ गणपतीचा पोषाख**शीर्षक_ रुप सुंदर*

*काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित गणपती बाप्पा उत्सव सोहळा निमित्ताने विशेष काव्य लेखन उपक्रम*

*विषय _  गणपतीचा पोषाख*

*शीर्षक_ रुप सुंदर*


मोरया रुपडे सुंदर 
असे निर्गुण निराकार
पाहताच मन  प्रसन्न
सुंदर तुझे अलंकार.. १

तुझ्याच नावे होई शुभ 
कार्याची जगी सुरुवात
रोज तुझे नाव घेऊनी
आनंदे  सजते प्रभात.. २

अंगावरी पिवळा शेला
पितांबर तो शोभे लाल
उजव्या हाती घेत चक्र
गोबरे छान छान गाल..३

कान तुझे ते सुपा परी
पोट मोठेच लंबोदर
भक्तगणांचे घाली पोटी
आशीर्वाद तो आम्हावर.. ४

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता