आवडते काव्य - अष्टक्षरी**नात मैत्रीच*
काव्यबहर साहित्य समुह आयोजीत उपक्रम
*आवडते काव्य - अष्टक्षरी*
*नात मैत्रीच*
सदा असे तुझं माझं
नातं मैत्रीच्या गोपात
मन मोकळी करत
एकमेकांच्या मनात.. १
मैत्री विश्वास प्रतीक
होते मनाची गुंफण
मनातलं सांगण्यास
नसे नात्यास कुंपण.. २
कृष्ण सुदामा सारखी
सोडोनिया अहं भाव
राधा कृष्णा सारखी
सोसे विरहाचे घाव.. ३
तरी ही अतूट मैत्री
दोघांचाही निष्ठाभक्ती
विरही अपार प्रेम
नसते कसली सक्ती.. ४
मैत्री असे खरा धागा
निरपेक्ष नात्यातला
मैत्री भावनेनं वागा
ओलावा तो मनातला.. ५
दुःखाच्या वाळवंटात
मैत्री म्हणे मृगजळ
हवी पारखी नजर
भेटीसाठी तळमळ..६
बांधत मनाचे बंध
फुलाप्रमाणे सुगंध
दरवळे चहुदिशा
तोच सच्चा मैत्रीगंध.. ७
आपली मैत्री सख्यांनो
लाईक द्या नका देऊ
सुरभी ही दरवळे
मैत्रीचा वसा तो घेऊ.. ८
प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड पुणे