हरितालिकेनिमित्त उखाणेआजचा उपक्रम उखाणा

काव्य बहर साहित्य मंच भंडारा
हरितालिकेनिमित्त उखाणे
आजचा उपक्रम उखाणा


१) उद्या क्षमापनाचा, हरितालकीचा दिवस 
तपाने जपान सजवले मनाचे दार
जीवनात सुरेखाच्या प्रकाशरावामुळे असे सुख संपदा सौख्य फार
 
२) पैठणी शालू चा भरजरी पदर
प्रकाशराव संसारात आनंदी किरणांनी सुरेखाचा करे सदा आदर 

३) प्रकाशराव तुमचं येणं जाणं मृगजळ इशारा
विरहाच्या वेळी त्या आठवणींचा मिळे सहारा

४) चांदण्या रात्री तुम्ही आणला चंद्र भुईवरी
प्रकाश रावांचं नाव घेते  आदराने पदर घेत डोक्यावरी

५) प्रकाशराव गाण्याचा तुम्हाला नाद
सुरेखा गाते जीवन भैरवी तुमच्या सवे जीवनाचा घेत स्वाद

६) प्रकाशराव तुमच्या सहवासात मन विरघळे
सहवासानं आपल्या जग भासे अनोखे निराळे

७) प्रकाश रावांच्या आठवणीत मन मारते उसळी 
येताच घरी फुलतो मनाचा पिसारा सुरेखा तुमची भोळी

८) संसार सागरात सुरेखा प्रकाश रावांची नौका 
नाव घेते दादल्याचं कान देऊन ऐका

९) प्रकाश रावांचे रिमझिम श्रावणात होता आगमन
अविचारांचं नकारात्मक विचारांचं होऊन जातं दमन

१०)जगात आहेत अनेक खंड
खंडात खंड आशिया खंड
आशिया खंडात भारत देश
भारत देशात 28 राज्य
राज्यात राज्य महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्हा
पुणे शहरात चिंचवडगाव 
चिंचवड गावात मोरयाच महत्व
श्रद्धा भावाने गेले मोरया
गोसावी  मंदिराच्या गाभाऱ्यात
मोरयाला केले नमन
बाजारात केले गमन
बाजारातून घेतली हंडी
हंडीत ओतलं  गोमातेच दूध
दुधात घातला इरजण
दुधाचं झालं दही
दह्यातून काढलं लोणी
अशी  *सुरेखा शहाणी*
*प्रकाश रावांच्या रागाचं*
 *करते पाणी पाणी*


प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे