विषय:-- *कवी अरुण दाते यांची शब्द ओळ* *गाण्यात हृदय झुरायचे* *

Date: 25 Aug 2025

*💐काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित सोमवार दिनांक २५-८-२०२५ चा दैनिक उपक्रम क्रमांक ९९८💐*
     उपक्रम. :---   *शब्द ओळ कवीची*
                        
     विषय:--  *कवी अरुण दाते यांची शब्द ओळ*
               *गाण्यात हृदय झुरायचे* *

झाल्या तिन्ही सांजा गाणं ते
गात गाण्यात हृदय झुरायचे
कडा पापण्या होई रे ओल्या
विरहात मन विदीर्ण व्हायचे..१

तुझी रात्रंदिवस वाट पाहिली
डोळ्यावरची झोपच  उडाली
सदा मी वेडी गाणं गुणगुणत
तुझीच वाट बघतच राहिली..२

वाट बघत बघत मन उसवल
विरहाने अस्वस्थ होत राहे मी 
 आठवणीच्या रे साठवणीतून 
मनास सदा शिवत राहिले मी..३

तुझ येण जणू मृगजळ इशारा
कातरवेळी कोणाचे रे सहारे 
नको  करू ते डोळ्याने इशारे
पाहता माझे सारे अंग शहारे..४

मी तुला नेहमी हृदयात ठेवले
सख्या नजरेचे ते खेळ तुझे पुरे
आठवणीं च्या  साठवणी मध्ये
सदा माझे हृदय झुरायाचे बरे..५

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे