विषय : बैल पोळा सण*

*ArLiEn KA  अध्यात्म पुणे प्रतिष्ठान*  
      *उपक्रम क्रमांक: ६२*
*दिनांक:२२ /० ८ / २५*
—--------------------------------
     *विषय : बैल पोळा सण*
**********************

अष्टाक्षरी

अमावस्या श्रावणाची 
बैलपोळा आनंदाचा
थाट पुरण पोळीचा
सण तो कष्टकऱ्यांचा.. १

बळीराजा सजवितो
सर्जा राजा भक्तीभावे 
माळा घाले घुंगराच्या
सदा परंपरा गीत गावे..२

श्रम दानाचे महत्त्व
नाही आनंदाला तोटा
जाणे बळीराजा सदा
हर्षोल्लसे भरे गोटा.. ३

झूल  घाले पाठीवर
गळी घुंगराच्या माळा
करू मनोभावे पूजा
ऋण व्यक्तचा सोहळा ..४

बळीराजा उपकार
तुझे आहेत अनंत
धनधान्य भाव नसे
सदा वाटे मनी खंत..५

शेतकऱ्याचा तो मित्र
बैल राबे सदा शेतात
सोने पिकवि मातीत
भिजे दोघेही घामात..६

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे