विषय -- उसवलेल्या नात्यांची विण

विषय -- उसवलेल्या नात्यांची विण
 

सदा ही जोडत रहावे
उसवलेल्या नात्यांची
 सैल करू घट्ट वीण 
हीच किल्ली आनंदाची.. १

दुरावलेल्या मनाला
प्रेम धाग्याने बांधूया
अहंकाराच्याच भिंती
सदा आपण तोडूया.. २

क्रोध मान माया लोभ
षडरीपूना टाळूया
जुन्या स्मृतींना उजाळा
देत  आनंदे जगूया.. ३

अनाथांचे नाथ व्हावे
सतपात्री दान द्यावे
प्रामाणिक कार्यातून
सत्कर्म करत राहावे.. ४

छोट्यांस वात्सल्य द्यावे
मोठ्यांस आदर ध्यावा
सदा उसवलेल्या मनाला
प्रेम धाग्यांनी शिवावा.. ५

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता