विषय :- भ्रमाच्या धुक्यातून - मी आहे ना म्हणूनच..! अष्टाक्षरी
*काव्यबहर साहित्य मंच, भंडारा.*
*दिनांक :- ११.०८.२०२५ (सोमवार)*
*उपक्रम क्रमांक :- ९८४ (कवी विशेष काव्य)*
*शब्दकवींचे :- कवी नारायण सुर्वे यांची शब्द ओळ*
*विषय :- भ्रमाच्या धुक्यातून - मी आहे ना म्हणूनच..!
अष्टाक्षरी
मी आहे ना म्हणूनच
सारं होत आहे बरं..!
भ्रम धुक्यातून येता
सत्य दिसे भरभर ..! १
गांधी,नेहरू,इंदिरा
आले गेले,ना कोणाचे
कोणा वाचुनी अडले
हेच सावट धुक्याचे..?२
धागे निखळ मैत्रीचे
विश्वासाने सांधायचे
धुक्यातून सावरण्या
प्रेम भरे गुंफायचे.. ३
रिमझिम पावसात
तुझी माझी प्रीत फुले
धुक्यातून वाट काढे
समर्पित होत झुले.. ४
सुरक्षित वसुंधरा?
करा आत्मपरीक्षण
वसा घेण्या संरक्षण
करा स्वतः परीक्षण.. ५
समर्पित स्त्री सुंदर
स्थान द्यावे माणसाचे
नको उपमा देवीची
काम पुरुष वर्गाचे.. ६
कामा पुरताच मामा
येई भाच्याच्याच कामा
काका मला हो वाचवा
सोडा मनातील भ्रमा.. ७
हेवे दावे संपत्तीचे
बंधू-भगिनीं अबोल
सारे ठेवून जायचे
आहे संतांचे हे बोल.. ८
माणसाच्या प्रगतीचा
फुटे भ्रमाचा भोपळा
परिस्थिती हद्दपार
दिसे मृत्यूचा सापळा.. ९
शिक्षणाची धरे कास
असे संस्काराचा वास
करूनीया पाश्चिमात्य
संस्कृतीचा सदा ऱ्हास.. १०
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे