थोर पुढारी - मेधा पाटकर*
काव्यभर साहित्य मंच भंडारा आयोजित गुरुवारचा,उपक्रम
*थोर पुढारी - मेधा पाटकर*
थोरच समाजसेविका
आहे मेधा पाटकर
करतात समाजसेवा
व्यक्तिमत्व हे भरदार.. १
नदी नर्मदा वाचवण्या
प्रयत्न सदा खडतर
वेळप्रसंगी आंदोलन
संकट समई कणखर.. २
प्रश्न सोडवण्या पाण्याचा
चाळीस वर्ष झगडल्या
उंची वाढवून सरोवराची
पाणी समस्या सोडवल्या.. ३
भूमी ऋषींची पावन ही
नर्मदा तापी भिमा भामा
देशाच्या या रक्तवाहिन्या
उर्जित केल्या गाळून घामा.. ४
स्वातंत्र्यवीराची ही कन्या
समाजसेवेचा घेऊनी वसा
समाज द्रोहींना नमवूनी
स्वकार्याने उठविला ठसा..५
सलाम ताईच्या कर्तुत्वाला
आदर्श त्यांच्या नेतृत्वाला
समाज कल्याण दातृत्वाला
ओघवती त्यांच्या वक्तृत्वाला.. ६
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे