उपक्रम. *चित्र काव्य*विषय:- *चित्राला अनुसरून काव्य लेखन करणे* शीर्षक:-- *दान*

उपक्रम. *चित्र काव्य*
विषय:-   *चित्राला अनुसरून काव्य लेखन करणे*

   शीर्षक:--  *दान*

योनीमधे मानवाचा
चौ-याऐंशी जीवलक्ष
सर्वश्रेष्ठ आहे जन्म 
सत्कर्मास रहा दक्ष..१

आज आहे उद्या नाही
असे शरीर नश्वर
करा अवयव दान
उपकार तो सत्वर.. २

देता हृदयरोपण
शस्त्रक्रिया किडनीचे
मिळे त्यांना पुनर्जन्म
बंध ते पुण्यकर्माचे  .. ३

नेत्रदान करताना
हर्षोल्हास हवा भारी
गेल्यावर जगा पाही
कृती ही सुंदर सारी.. ४

हाव हाव माणसाला
समाधान देत नाही
गरजूला देतानाच
सत् पात्री दान होई..५

सदा हसून खेळून 
जगायचं,तुझं माझं
व्यर्थ नाही करायचं
दिसे ते वागणं तुझं.. ६

दानशील तप भाव
चार हेच मोक्ष द्वार
देत राहू सदा दान
घेणाऱ्याचे हो साभार..७

म्हणे विंदा घेणाऱ्यानी
घेत जावे, घेता घेता
हात ते दानी घ्यावेत 
द्यावे सदा जाता जाता.. ८

दान प्रकार ते दहा
अन्न,जलदान शान
भयदान लज्जादान
कृत,गौरव ते दान.. ९

द्यावे अनुकम्पा दान
छान ते कारूण्य दान
सदा रहावे हसत
ठेवा आनंदाचे भान.. १०

शब्दांचे अर्थ
अन्नदान -भुकेलेला अन्न देणे
जलदान _तहानलेल्या पाणी देणे
भयदान- भीती पासून मुक्ती देणे
लज्जादान- लाज राखण्यासाठी दिलेले दान उदाहरणार्थ कृष्ण द्रौपदी
गौरवदान-यश प्राप्तीसाठी केलेले दान ,उदाहरणार्थ विद्यादान
कृतदान- उपकाराची फेड उपकारा न करणे
अनुकंपादान- दुःखी व्यक्तीच, प्राण्याचं दुःख कमी करण्यासाठी केलेले दान
कारुण्य दान- प्रिय गेलेल्या व्यक्तीच्या स्मृती प्रित्यर्थ दान देणे. 

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!