उपक्रम. शब्द ओळ कवींची भावना आपल्या मनीची आजचे कवी:-- *कुसुमाग्रज यांची शब्द ओळ*

उपक्रम. शब्द ओळ कवींची 
              भावना आपल्या मनीची 
आजचे कवी:-- *कुसुमाग्रज यांची शब्द ओळ*
      
विषय:--  *कधी आर्तता काळजातली*

असावी अर्तात काळजातली
आनंद घ्यावा, द्यावा जगाला..! 
शरीर भाड्याचे घर खाली कर
मग माझे कबाड ओझे कशाला? 
तुटणाऱ्या मानव्याला जोडावा
सुखाच्या भाव धाग्यांना ओढून
बाह्यदिखावा ओंगळवाद तोडावा
भ्रष्ट राजकीयाचे चेहरे ओळखून
मतासाठी लाचार झालेला भ्रष्ट
राष्ट्र विकायला निघाले भस्मासूर
ऑल इज वेलची अफू देऊनीया
संवेदनाशून्यतेस बधिर करे असुर
दिल्लीतील निरपराध निर्भयांच्या
मृत्यू तांडव होई सर्वाच्या साक्षी 
कुठे हरवली अर्तता काळजातली
परमेश्वरा सर्वां सद्बुद्धी देत रक्षी
मनी असावा जिव्हाळा प्रेम माया
सदा समजून घ्यावे एकमेकाशी
कशास हवी स्पर्धा का हवा राग? 
 स्पर्धा करावी स्वतःच स्वतःशी
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण