विषय.. चित्रकाव्य शिर्षक.. अशी आई
काव्यबहर साहित्य मंच भंडारा आयोजित उपक्रम..श्री काव्याची कार्यशाळा
विषय.. चित्रकाव्य
शिर्षक.. अशी आई
कथा माझ्या
आईची
ओतप्रत तपस्यानं भारलेली
कासवाच्या नजरेची.. १
घार उडे
आकाशी
तिचे लक्ष जडे
सदा पिल्लापाशी.. २
जननी जन्मभूमी
गोजिरी
सर्वांवर नजर भिरभिरी
मुलांसाठी साजिरी.. ३
अशी आई
शिवबांची
शूरवीर प्रेमळ धाडसी
असावी सर्वांची..४
अशी आई
श्यामची
जणू वाटिका सुसंस्काराची
गरज काळाची.. ५
आई शिकवी
पहिल्यांदाच
अ,आ,ई
आरंभ साधनेचा.. ६
आमची आई
निसर्ग
सदा देत राहणारी
नसे विसर्ग.. ७
ठेच लागता
पायाला
'आई गं' म्हणत
आठवतो आईला.. ८
प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड पुणे