चित्रकाव्य विषय.. पाऊस आला

काव्यबहर साहित्य मंच भंडारा आयोजित उपक्रम.. चित्रकाव्य
 विषय.. पाऊस आला

धडाडssधूमss पाऊस आला
लोट पाण्याचे वाहतात बेसुमार
सर्वच रस्त्यावर महापुरा आला
पावसाने सर्वत्र  केला भडीमार
सतत दामिनी लागे कडकडायला
ठेका काळजाचा लागे चुकायला
उधाण  येत राही वादळ वाऱ्याला
शाळेस सुट्ट मुलं लागलीरस्त्याला
बाबांन ताईला लाल छत्रीत घेतले 
सोनूमोनूने पाऊस अंगरखे घातले
भयभित पाण्यात चालू लागले
पावसाने या सृष्टीस भयाने भारले
अतिवृष्टी ने घरे पाण्यात डुंबली
दाही दिशांना काळोख हा भरला
शाळेच्या मुलांची वर्षाने फाडली
सर्दीखोकला मुलांचा ताप वाढला
मुले कागदी नावा सोडू लागली
शाळा सुटली दप्तर ही भिजली
पाण्यात गाडी पोहत डुंबू लागली
सर्वाच भंबेरी त्रेधातीरपीट उडाली
प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता