कविता सामाजिक विषय :-दिशाहीन युवाशक्ती*

*काव्य बहर साहित्य मंच भंडार-आयोजित* मंगळवार दिनांक
8/7/2025.
 उपक्रम-सामाजिक विषय :-दिशाहीन युवाशक्ती*


कलियुगातील हा आहे हो प्रताप
संस्कारहीन दिशाहीन युवाशक्ती
संस्कार,संस्कृती, स्वत्व सोडूनीया
उंबरठ्याच्या बाहेर जडे त्यांची भक्ती          
 १.
सदा बेसूर तारुण्याच्या तालावर
हिडीसपणे नाच गाणी गायला
स्वैराचाराने समाजात वावरायला
जणू नसे कुणी घरी विचारायला        २.
प्रतिष्ठेच्या पाऊलवाटेनंं आलेली व्यसने,तारुण्यातील कुसंगती
सुखवाह वस्तूला चटवलेली  बिन मणक्यांच्या जीवनशैलीत रंगती
3.
वडिलोपार्जित जमिनीवर गुंठापती होऊन मुले घेत असतात मुक्त श्वास 
धरलं तर चावतं सोडलं तर पळत्य
घडलं मनाविरुद्ध की जीवनाचा-हास
४.
घराघरात जीव घुसमटून  घरपण 
हरवणारी गॅसचेंबर का होत आहेत? 
मन विदिर्ण करणाऱ्या दुःखाची     
पूर्वतयारी ही युवा पिढी करत आहे ? 
५.
आज नव्या पिढीची संगणक भाषा 
 मोबाईल लॅपटॉपच्या काच पडद्यावर   
माऊसच्या तालावर कीबोर्डच्या लेखणीवर 
 विज्ञान युगात जगाला आणते भानावर    
६.
स्वप्न पाहून उंच उंच घेतात भरारी
युवकांचे ती असणे तो असणे यापेक्षा
'स्व' असणे आत्मिक आविष्कार भारी
पण आयत्या बिळात नागोबाची स्वारी 
७.
नवे प्रवाह थोपवता येणारच नाहीत
नव्यानं जुन्याना सोडून चालत नाही
कधीही मुळे तोडून  वृक्ष वाढत नाही
पुसून इतिहास जुना नवा लिहिता येत नाही
 ८.

प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड ,पुणे  33

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!