विषय :- नागपंचमी (हायकू प्रकार) काव्यप्रकार
*काव्यबहर साहित्य मंच, भंडारा.*
*दिनांक :- २९.०७.२०२५ (मंगळवार)*
*उपक्रम क्रमांक :- ९७१*
*विषय :- नागपंचमी (हायकू प्रकार)*
श्रावण शुक्ल
नाग पंचमी सण
आनंदी जण.. १
नागची पूजा
साजरी घरीदारी
ती परंपरा..२
जिवंत नाग
बतिसशिराळसी
भावे पूजसी.. ३
घे दूध लाह्या
नागोबा भाऊराया
पडते पाया..४
मुलीं माहेरी
हाती मेंदी काढत
फुले स्वप्नात.. ५
मेंदी लावूया
वाटून मेंदी पाला
उष्मास घाला.. ६
नागपंचमी
मित्र शेतकऱ्यांचा
मान नागाचा..७
मेंदी भरल्या
हातावरली नक्षी
नागाच्या साक्षी ..८
स्वप्नांचा झोका
उंच उंच टांगला
नभा भिडला..९
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे