कविताविषय : कंठ दाटून येतो

*काव्य बहर साहित्य मंच भंडारा*
            *आयोजित*
**सोमवारचा उपक्रम*
*कवयित्री शांता शेळके यांची शब्दओळ*
     
*विषय :  कंठ दाटून येतो
*सोमवार दिनांक :-१४/०७/२०२५*

मम् दाटून कंठ येतो
सासूचे बोल लागती मनाला
ममतामयी आईचा आठव येता
हृदय भरून येई माझे क्षणाक्षणाला

मम् जीव गुंतला तुझ्यात
सदा काटे जरी मला दिलेस तू
भाव भावनेने मी गुंतले रे तुझ्यात
दाटून कंठ येतो परतून ये ना जरा तू

गोंधळून रे मी जाते
दुःख  येता पाहुण्यासारखे
त्याचे पाश मी सदा तोडत जाते
तरी दुःख वावरू लागे घरधन्यासारखे

सख्या कंठ दाटून येतो
संसारात टाकता डाव रे मी
खेळ तू मोडण्यास नेहमी येतो
अर्ध्यावर डाव आजच सोडून जाते मी

सख्या कंठ दाटून येतो
पाहत डोळे तुझे ते नशिले
स्वप्नात माझ्या नेहमी तू येतो 
डोळ्याचे सौंदर्य लावे मम् मना वशिले

प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता