विषय :- मोर**शीर्षक :- जैन साधूंची पिंची**अष्टाक्षरी कविता*

अर्लीयन के. ए. अध्यात्म पुणे प्रतिष्ठान आयोजित उपक्रम 
उपक्रम क्रमांक :- ४१
दिनांक :- २७/०७/२०२५
*विषय :-  मोर*
*शीर्षक :- जैन साधूंची पिंची*
*अष्टाक्षरी कविता*

तुझे सौंदर्य अप्रतिम
असतो राष्ट्रीय पक्षी
हिऱ्या पाचूनं मढला
तुझं सौंदर्य आहे साक्षी..१

आकाशी मेघ गर्जता
फुलवतोस  पिसारा
हिरे पवळे माणके
याचा सुंदर नजारा.. २

असे तू रत्नजडित 
सरस्वतीचे वाहन
कृष्णाच्या मुगुटात तू
दिसतो मोहक  छान.. ३

पिसारा फुलवताना 
 थुईथुई नाचे मन
तुझे नृत्य पाहताना
हरकून जाती जण.. ४

 देव सौंदर्य वाटताना
 विसरे भूक तहान
 उदारहस्ते वाटतो
तुजला सौंदर्याचे वाण.. ५

मोरपीस  सदा सांगे
मोहची सोडा आसक्ती 
 संसारात राहूनिया
असावी सदा विरक्ती.. ६

 जैन साधु वापरती
मोरपिसाची ती पिंची
दयाभाव बाळगूनिया
पुण्यकर्म  सदा सिंची.. ७

शब्दार्थ 

पिंची- दिगंबर जैन साधू दया भाव राखण्यासाठी व जीवांना जीवदान देण्यासाठी या मोराच्या पिसान तयार केलेल्या झाडू सारख्या *एकत्रित केलेल्या मोरपिसांना पिंचीचा* म्हणतात याचा वापर करून सूक्ष्मजीवांना जीवदान देतात 

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!