कवितेचं पान*कोणी काही म्हणा..!
साहित्य संवेदना
४/७/२०२५.
*कवितेचं पान*
कोणी काही म्हणा..!
*कोण काही म्हणा**
लेकीची सर सुनेला येणारच नाही
सुने शिवाय घराच्या वंशाचा पाळणा हलणार नाही...
कोणी काही म्हणा,
सासऱ्याची गळाभेट सून घेत नसते
वडीलाची गळाभेट घेतल्याशिवाय लेक जात नसते...
कोणी काही म्हणा,
लेकीला आपण स्वःताचं फक्त ताट देतो
सुनेला मात्र स्वःतचा बसण्याचा पाठ ही देतो..
कोणी काही म्हणा,
लेकीचं लेकरू उडत ऊडत पाखरू
सुनेचं लेकरू चिकटा चिकट भोकरू...
कोणी काही म्हणा,
लेक म्हणतात परक्याचं धन असतं
सुनेच्या पावलाने घरात लक्ष्मीच येण असतं
कोणी काही म्हणा,
मनातली प्रत्येक गोष्ट लेकीला सांगतो
घरातली हर गोष्ट मात्र सुनेच्या कले कलेनेच घेतो
कोणी काहीही म्हणा,
(मुलाला)कलेजाच्या तुकड्याला
सुनेच्या हवाली करतो
स्वतःची जागा लेकीला नव्हे सुनेलाच देतो
कोणी काही म्हणा,
अगं आईच्या! रागवण्याचं समजावनं वाटत असतं
अहो आईच्या! सांगण्याचं बोल लावणं वाटतं असतं
कोणी काही म्हणा,
फरक असतो नात्यांतील अहो,अगं या शब्दांचा
या शब्दांमुळे अर्थ बदलतो
नात्यां गोत्यांचा
सुरेखा कटारीया चिंचवड पुणे मोबाईल नंबर 9822745030