आजचा उपक्रम श्री काव्य *अव्यक्त प्रेम*

काव्य बहर साहित्य मंच 
आजचा उपक्रम श्री काव्य 
*अव्यक्त प्रेम* 

डोळ्याचा इशारा
मूक भावना
संवेदना करते व्यक्त
दुराव्याच्या वेदना.. १

कृष्णाच्या संगती
राधा
निशब्द राधेचा आहे
स्वभाव साधा.. २

कृष्ण अचानक
भेटता
क्षणभर वीज लखलखे
राधा हसता.. ३

बोल घेवडी
जरी
अव्यक्त होते घडले 
मनाविरुद्ध तरी.. ४

एकमेकाची नजर 
मिळली
नजरेत तुझ्या प्रेमाची
साक्ष कळली.. ५

प्रियकर,सखा
मित्र
सदा हृदयात, तुझे 
कोरते चित्र.. ६

प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता