विषय :- खऱ्याला मरण नाही*

*काव्यबहर साहित्य मंच, भंडारा*
*दिनांक :- ०३.०७.२०२५  गुरुवार (म्हणी विशेष)*
*विषय :- खऱ्याला मरण नाही*

खऱ्याचं खोटं करताना, शब्द  असे वकिलाचे सोबती
चोरांना चौदावे रत्न दावतांना, पोलीस त्यांच्या सोबती

राजहंस पाण्याचं पाणी दुधाचं दूध करताना
खऱ्याला मरण नाही, शोधतांना असे सत्याला सोबती

पास नापास उदघोषणांनी, हिरमुसलेला विद्यार्थी
पराजयाच्या भावनांना, तीळ पापड जाणताना सोबती

सूड ,बदला ,घोषणांनी सतत पेटणारी माणसे
खायला चटक्याचे भुईला भार असताना, घृणा त्याच्या सोबती

चोरीचा माल गपा गप होतच, असतो लक्षात ठेवा
खर्‍याला कधी मरण नसतं, शब्द संतांचे असता सोबती

प्रा. सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे 33.

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण